Wednesday, October 29, 2025

अहील्यानगर जिल्ह्यात तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी १५० कोटींचा निधी मंजूर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रा करीता ४३ कोटी ६लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजना महायुती सरकारने जाहीर केली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्व जिल्ह्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १४९ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र विकासातून पर्यटन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी मागील काही वर्षात जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते.जिल्ह्यातील महत्वपूर्ण आशा तिर्थक्षेत्रांच्या विकास कामांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील तिर्थक्षेत्रांच्या ३०कामां करीता निधी उपलब्ध व्हावा म्हणून दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.

संगमनेर तालुक्यातील तळेगांव दिघे येथील श्री बिरोबा महाराज देवस्थान परिसराची पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुधारणा व सुशोभिकरण करणासाठी- रु.४९२ लाख, ओझर खुर्द येथील नेमबाई मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी २५ लाख, निंबाळे येथील मोठेबाबा मंदिर (मच्छिंद्रनाथ मंदिर) परिसर सुशोभिकरणासाठी २५ लाख, अंभोरे येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी रु.१४.६ लाख, कोल्हेवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी रु.२५ लाख, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर परिसर सुशोभिकरणाठी रु.१९.८ लाख, धांदरफळ खुर्द येथील श्री बिरोबा देवस्थान परिसर सुशोभिकरणासाठी रु.१५ लाख, साकूर येथील श्री विरभद्र देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी रु.५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील सरला बेट येथील गंगागिरी महाराज संस्थान येथील विकास कामांसाठी ४९८ कोटी, उंदिरगाव ते श्री क्षेत्र सरलाबेट राज्यमार्ग २१० (माळेवाडी ते सरालावेट ७कि.मी.) या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी रु.५०० लाख मंजूर आहेत.

जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ विकास कामांसाठी रु.४१३ लाख, श्री.क्षेत्र खर्डा येथील श्री.सिताराम बाबा देवस्थान मंदीर सभामंडप व महंत सभा मंडपासाठी रु.३०० लाख, तर पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा देवी परिसरात पर्यटन विसावा केंद्र बांधकामा साठी रु.२५० लाख, मळगंगा देवी परिसरात पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे व संरक्षण भिंत बांधकामासाठी रु.१३० लाख,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ते मंदिर कुंड रस्ता कॉक्रोटीकरणासाठी रु.६५ लाख, निघोज येथील मंळगंगा देवी परिसर सुशोभिकरणासाठी रु.५५ लाख मंजूर झाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील श्रीक्षेत्र दर्शन मंदिर परिसर सुशोभिकरण व सभामंडपासाठी रु.४०.६६ लाख, श्री क्षेत्र मोहटादेवी जगदंबा माता येथील घाट दुरुस्तीसह सुधारणा करण्यासाठी रु.२०० लाख, घाटशिरस येथील वृध्देश्वर देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी रु.४९.९९ लाख, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण करणे रु.१५०.४९ लाख रूपये या योजनेतून उपलब्ध होणार आहेत.

श्री क्षेत्र मढी ते तिसगांव रस्ता (इजिमा ३३३) कि.मी. ०/०० ते ५/०० मध्ये रस्त्याची सुधारणा कामासाठी रु.३४० लाख, मोहटा देवी येथे ध्यान धारणा केंद्र व बहुउद्देशिय सभागृह बांधण्यासाठी रु.५५.२२ लाख मंजूर झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी रु.४९.९९ लाख आणि राहुरी तालुक्यातील कणगर येथील कनकावती माता मंदीर सभामंडप बांधकामासाठी रु.३५ लाख, म्हैसगाव येथील केदारेश्वर महादेव मंदीर सभामंडप बांधकामासाठी रु. २० लाख, राहुरी बुद्रुक येथील खंडोबा महाराज मंदीर परिसर सुशोभिकरणासाठी रु.२० लाख, ब्राम्हणगाव येथील श्री जगदंबा माता देवस्थान परिसर सुशोभिकरणासाठी रु.४९.६६ लाख तसेच अकोले तालुक्या,तील निंब्रळ येथील अंबिका माता देवस्थान ट्रस्ट येथे सुशोभीकरणासाठी रु.२०० लाख, कोतुळ येथील कोतुळेश्वर महादेव मंदीर विकासकामांसाठी रु.१५० लाख तर शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदीर सभामंडप बांधण्यासाठी रु.५०लाख मंजूर झाले आहेत. अहिल्यानगर जिल्हयातील एकूण 30 कामांसाठी सुमारे ४३ कोटी ६ लाख रुपये निधी मंजूर झाल्याने तिर्थक्षेत्र विकासाच्या कामास मोठी गती मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles