Wednesday, March 11, 2026

पाथर्डी तालुक्यात मढी घाटात दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

मढी घाटात दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद टोळीतील 04 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडुन ताब्यात.
श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले होते.
वरील पथकाने दिनांक 07/03/2025 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मढी यात्रा बंदोबस्त व दरोडा प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील इसम नामे 1) आकाश मोहन डुकरे, 2) विकास दत्तु म्हस्के, हे त्याचे इतर 04 ते 05 साथीदारांसह मढी ते पाथर्डी जाणारे रोडवर मढी घाटामध्ये रोडवर थांबुन सशस्त्र दोरडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी मढी ते पाथर्डी जाणारे रोडवर मढी घाटामध्ये रोडचे कडेला अंधारात काही इसम संशयीतरित्या हातामध्ये हत्यारे घेवुन उभे असल्याचे दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन चार इसमांना ताब्यात घेतले व इतर इसम पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) आकाश मोहन डुकरे वय- 26 वर्षे रा. विजयनगर पाथर्डी, जि. अहिल्यानगर, 2) विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के वय- 25 वर्षे रा. माणिक दौंडी चौक पाथर्डी, जि. अहिल्यानगर, 3) अदित्य दिपक बोरकर वय- 23 वर्षे रा. तनपुरे गल्ली राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर, 4) शरद श्रीरंग जाधव वय- 40 वर्षे वागल खेडा ता. अंबड जि.जालना असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना पळुन गेलेल्या इसमाचे नांव गाव विचारले असता त्यांनी काहीएक माहिती सांगितली नाही. नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती व गाडीची झडती घेतली असता, त्यांचे कब्जात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे. रु. 12,000/- किंमतीचे 3 मोबाईल, एक स्क्रु ड्रायव्हर असा एकुण रु. 12,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles