Friday, February 20, 2026

अहिल्यानगर जिल्हयांत मोटार सायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद,वाहनाचा प्रकार चेसी नंबर इंजीन नंबर

अहिल्यानगरसह इतर जिल्हयांत मोटार सायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद
2 आरोपीकडून 8,70,000 /- रू किंमतीच्या 8 मोटार सायकल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस स्टेशनला मोठया प्रमाणावर मोटार सायकल चोरीचे गुन्हे ना उघड असल्याने मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नाउघड मोटार सायकल चोरी गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, सुनिल मालणकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुन अहिल्यानगर जिल्हयातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

दि.26/05/2025 रोजी पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हयातील मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करत असताना, पथकास गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम, रा.रांजणगाव रोड, ता.राहाता याचेकडे चोरीच्या मोटार सायकल असून तो विक्रीसाठी राहाता ते पिंपळस रोड, राहाता येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहाता ते पिंपळस रोड येथे सापळा रचुन संशयीतांचा शोध घेऊन 1) ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम, वय 20, रा.रांजणगाव रोड, ता.राहाता, जि.अहिल्यानगर 2) सोनु सुधाकर पवार, वय 24, रा.साकुरी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम याने ताब्यातील मोटार सायकल या सोनु सुधाकर पवार व 3) गणेश गोरखनाथ दरेकर, रा.पिंपळगाव जलाल, ता.येवला, जि.नाशिक याचेसह राहाता व श्रीरामपूर येथून चोरी केल्याची माहिती सांगीतली.तसेच आरोपीतांकडे त्यांनी आणखी इतर ठिकाणी मोटार सायकल चोरी केलेबाबत विचारपूस केली असता नमूद 3 आरोपीतांनी अहिल्यानगर, नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणावरून मोटार सायकल चोरी केल्या असून, चोरी केलेल्या मोटार सायकल या खटकळी, देहेगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर येथील काटवनात लावलेल्या असल्याची माहिती सांगीतली. पथकाने पंचासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातील व देहेगाव येथील काटवनातील 8,70,000/- रूपये किंमतीच्या एकुण 08 मोटार सायकल जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. वाहनाचा प्रकार चेसी नंबर इंजीन नंबर
1 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C2JH255953 U3S5C2JH222503
2 बजाज कंपनीची पल्सर 150 सीसी MD2A11CZ7FWH24966 DHZWFH90537
3 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C1FK300821 U3S5C0FK904890
4 होंडा कंपनीची सी.बी. युनिकॉन ME4KC09CBE8674311 KC09E86683549
5 हिरो कंपनीची एचएफ डिलक्स MBLHAW395R5L80725 HA11E1R5L03777
6 बजाज कंपनीची पल्सर 125 MD2B64BX9LWH23871 DHXWLH77652
7 बजाज कंपनीची प्लॅटीना 100 MD2A76AX5MWM16783 PFXWMM84452
8 बजाज कंपनीची प्लॅटीना 100 MD2A76AX0RWL22009 PFXWRL12084
आरोपीतांनी वाहन चोरी केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून, अभिलेखाची पडताळणी करून खालीलप्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.उर्वरीत चोरीचे वाहनाबाबत अभिलेखाची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles