सुपा परिसरामध्ये दरोड्याचे तयारीत असलेले 2 आरोपी, 1 विधीसंघर्षीत बालक
1,18,100/- रू. किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
आरोपी आरोपींकडुन सुपा येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
दिनांक 31/07/2025 रोजी रात्री तपास पथक सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनि/हरिष भोये यांना गुप्तबातमीदारा मार्फत शाम सुरेश उर्फ पैदास चव्हाण रा. विटेकरवाडी, ता. श्रीगोंदा हा त्याचे इतर साथीदारांसह म्हसने गांवचे शिवारातील म्हसने फाटा ते पारनेर जाणारे रोडवर दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी दिनांक 01/08/2025 रोजी रात्री 00.58 वा. चे सुमारास जावुन खात्री केली असता म्हसने फाटा ते पारनेर जाणारे रोडचे कडेला अंधारामध्ये दोन मोटारसायकलजवळ 5 इसम अंधारामध्ये थांबल्याचे दिसुन आले. पथक सदर इसमांना ताब्यात घेण्याचे प्रयत्नामध्ये असतांना त्यातील दोन इसम एका मोटारसायकलवर बसुन भरधाव वेगात निघुन गेले. उर्वरीत तीन संशयीतांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शाम सुरेश उर्फ पैदास चव्हाण वय 24 वर्षे, रा. विटेकरवाडी, काळेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, 2) विशाल गणेश भोसले वय 21 वर्षे, रा. बांबुर्डी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, 3) विधीसंघर्षीत बालक वय 17 वर्षे असे असल्याचे सांगितले. इसम नामे शाम सुरेश चव्हाण याचेकडे पळुन गेलेल्या इसमांचे नांव गांव विचारता त्याने पळुन गेलेल्या इसमांची नावे 4) ऋतिक सुरेश उर्फ पैदास चव्हाण रा. पारगांव, बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर (फरार), 5) प्रशांत दिलीप चव्हाण रा. लक्ष्मीनगर, कोपरगांव, ता. कोपरगांव, जि. अहिल्यानगर (फरार)
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. पथकाने पंचासमक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 1 लोखंडी कोयता, 18,000/- रुपये रोख रक्कम, 1,00,000/- रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल असा एकुण 1,18,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडे त्यांनी इतर गुन्हे केले आहे काय याबाबत विचारपुस करता त्यांचेकडुन सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 286/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 324(4), 352, 351(2), 3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
वर नमूद आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांचेविरुध्द विरूध्द सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. /2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310 (5), 310(6), आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालकांस सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


