अहिल्यानगर:वृद्ध नागरिकांना गाठून त्यांचे भविष्य सांगतो असे भासवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या असून, या कारवाईमुळे शहर परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे
आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष केले होते:
१. पहिली घटना (केडगाव): फिर्यादी संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८ वर्ष) हे २८ मार्च २०२६ रोजी केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेले असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून, हातातील सोन्याची अंगठी २० रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून खिशात ठेवल्याचे भासवले आणि ती लंपास केली.
२. दुसरी घटना (सावेडी): फिर्यादी अरुण सहादु निंबाळकर (वय ७४ वर्ष) हे सावेडी येथील पुणे एसटी स्टँडवर बसची वाट पाहत असताना, त्यांनाही याच पद्धतीने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवून त्यांची सोन्याची अंगठी चोरली होती.
तपास आणि मुद्देमाल हस्तगत
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून दोन अनोळखी इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या १,२०,०००/- रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (७ ग्रॅम आणि ५ ग्रॅम वजनाच्या) हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ च्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पूर्ण पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिलीप टीपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली आहे:
श्री. संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे)
प्रविण पाटील (पोलीस उपनिरीक्षक)
रोहिणी दरंदले (म.पो.हे.कॉ./१४६० – तपास अधिकारी)
राहुल शिंदे (पोलीस हे.कॉ.)
दौंड (पोलीस हे.कॉ.)
दिपक रोहकले (पोलीस कॉ.)
सत्यम शिंदे (पोलीस कॉ.)
सुरज कदम (पोलीस कॉ.)
सचिन लोळगे (पोलीस कॉ.)
राम हंडाळ (पोलीस कॉ.)
राहुल गुंडू (पोलीस कॉ., दक्षिण मोबाईल सेल)
या गुन्ह्याचा पुढील तपास म.पो.हे.कॉ./१४६० रोहिणी दरंदले या करत आहेत.


