Sunday, December 14, 2025

Ahilyanagar crime :मेंढपाळावर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

मेंढपाळाचे पालावर रात्रीचे वेळी दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
विळद, अहिल्यानगर सह छत्रपती संभाजीनगर येथील दरोडयाचे गुन्हे उघडकीस
5 आरोपीकडून 3,04,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 09/06/2025 रोजी फिर्यादी नामे पोपट बन्सी होडगर, वय 35, धंदा मेंढीपालन, रा.पिंप्री घुमट, विळद, ता.अहिल्यानगर हे मेंढया चारुन रात्री शेतामध्ये कुटुंबियासह झोपले असताना अज्ञात 6 ते 7 आरोपीतांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन, चाकुचा धाक दाखवून त्यांचे पत्नीचे दागीने जबरीने चोरुन नेले.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं.447/2025 बीएनएस कलम 310 (2), 311 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी घडलेल्या दरोडयाच्या गुन्हयांची माहिती प्राप्त होताच पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे अशाचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथके रवाना केले.
दिनांक 15/06/2025 रोजी पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटार सायकलवरून नेवासा मार्गे अहिल्यानगर येथे पांढरीपुल येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहिती वरून सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेऊन 1) भैय्या कडु काळे, वय 18, रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 2) ताराचंद विरूपन भोसले, वय 35, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 3) किसन उर्फ विजय गौतम काळे, वय 23, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 4) नागेश विरूपन भोसले, वय 20, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 5) सोनुल लक्षरी भोसले, वय 19, रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले.

ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार 6) बदाम कडू काळे, रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 7) रघुवीर विरूपन भोसले, रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर (फरार) 8) महेश नंदु काळे, रा.खोसपुरी, ता.अहिल्यानगर (फरार) अशांना मिळून अहिल्यानगर जिल्हयातील विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपालाचे पालावर पाच ते सहा दिवसापुर्वी रात्रीचे वेळी महिला व पुरूषांना मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 3,04,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चार मोबाईल व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात आणखी कोठे गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपीतांनी मागील 10 ते 15 दिवसापुर्वी मांजरी शिवार, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर मेंढपाळाच्या पालावर रात्रीचे वेळी मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगीतली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles