Thursday, September 11, 2025

चान्स मारण्यासाठी ब्लाऊजचं माप घेतोय का? गौतमी पाटीलचा खडा सवाल, अजित कुमारला घाम फुटला! Video

नृत्यांगणा गौतमी पाटील हिने गेल्या काही वर्षात तिच्या डान्स स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्रावर अक्षरश: मोहिनी घातली आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटीलने डान्स स्टेज गाजवले आहेत. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, आता गौतमी पाटील टिव्ही मालिकांमध्ये झळकलेली पाहायला मिळत आहे. तिने एका मराठी मालिकेत एन्ट्री घेतली आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत नृत्यांगणा गौतमी पाटील पाहायला मिळणार आहे. झी मराठीने या मालिकेतील गौतमीची पहिली झलक इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. यात गौतमी पाटील देवमाणूस मधील अजित कुमार म्हणजेच किरण गायकवाडशी संवाद साधताना दिसत आहे.


झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील अजित कुमारकडे ब्लाऊज शिवून घेण्यासाठी आलेली पाहायला मिळत आहे. यावेळी अजित कुमार तिला म्हणतो की, मी जुन्या मापांवर काम करत नाही. मी डायरेक्ट माप घेतो. दरम्यान, अजित कुमारला प्रत्युत्तर देताना गौतमी पाटील म्हणते, काळजावर हात ठेऊन खरं सांग.. माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयस ना? तुला मी कोण आहे माहिती आहे ना?

गौतमीच्या या प्रश्नांवर प्रत्युत्तर देताना म्हणतो, तुम्ही कोणाची तरी बहीण आहात. कोणाची बायकोही असाल. अजित कुमारचं हे उत्तर ऐकताच गौतमी पाटील म्हणते, माझं अजून लग्न झालेलं नाही. दरम्यान, या नंतर अजित कुमार गौतमीचं माप घेताना पाहायला मिळतोय. सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? असं कॅप्शन देत झी मराठीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांना रोज रात्री 10 वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटीलचा या मालिकेतील अभिनय पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles