नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या ‘देवमाणूस’ या मराठी मालिकेतील भूमिकेमुळे चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्सने भुरळ घालणारी गौतमी पाटील
आता टेव्ही अभिनेत्री म्हणून नाव कमावण्यास सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसात तिच्या देवमाणूस या मालिकेतील डान्सने धुमाकूळ घातला होता. देवमाणूस मालिकेतील आण्णा नाईक यांच्यासोबत तिचा डान्स पाहायला मिळाला होता. जो झी मराठीने इन्स्टाग्राम पेजवर शेअर देखील केला होता. दरम्यान, आता गौतमी पाटील हिने अजित कुमार याच्यासोबत आजवरचा सर्वात रोमँटिक सीन दिलाय.
झी मराठीने मालिकेतील एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अजित कुमार गौतमीच्या रुममध्ये जाताना दिसत आहे. अजित कुमार आतमध्ये जाताच दोघांमधील संभाषणाला सुरुवात होते. अजित कुमार म्हणतो, गौतमी छान झाला कार्यक्रम.. मी येतो.. यावर प्रत्युत्तर देताना गौतमी म्हणते, टेलर तुम्ही तर कमालच केली. एवढं करेक्ट फिटिंग बघितलं नव्हतं.. तेही अंगाला हात न लावता.. मला सांगा तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का?
दरम्यान, गौतमीने हा सवाल विचारताच.. अजित कुमार (टेलर) म्हणतो, मी बाईचा आदर करतो.. यावर गौतमी म्हणते, तुमचा सारखा माणूस शोधून सापडणार नाही कुठे..दरम्यान, गौतमी पाटील आणि अजित कुमार यांच्यातील संभाषण संपताच दोघांमधील रोमँटिक सीनला सुरुवात होते. दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहातात.. अजित कुमार म्हणतो, आता तर मला तुमच्याशिवाय अजिबात करमनार नाही. शिवाय अजित कुमार गौतमीला ब्युटीफुल देखील म्हणतो.
अजित कुमारचा आणि गौतमी पाटीलचा हा रोमँटिक सीन झी मराठीने इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांसाठी शेअर केलाय. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. गौतमीचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. गौतमी पाटीलच्या या भूमिकेमुळे देवमाणूस ही मालिका तुफान चर्चेत आली आहे. आता या मालिकेत पुढे काय होणार? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.