Wednesday, October 29, 2025

सबसे कातिल गौतमी पाटील थिरकणार सिद्धार्थ जाधवसोबत; सखूबाई गाणं प्रदर्शित

महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचे ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटातील सखूबाई हे पहिले धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारा धमाकेदार आयटम नंबर जल्लोषमय आहे.‘सबसे कातिल’ गौतमी पाटील आणि ‘एनर्जेटिक’ अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी या गाण्यात चारचांद लावले आहेत. या गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. तर, चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिलेले हे गाणं सोनाली सोनावणे हिने गायले आहे.

‘हे आयटम सॉंग करताना आम्हाला खूप मजा आली असून प्रेक्षकांनाही हे आयटम साँग प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, असा विश्वास या दोन्ही कालाकारांनी व्यक्त केला. चित्रपटातील गौतमी पाटीलचा हॉट आणि सिद्धार्थ जाधवचा कूल अंदाज प्रेक्षकांसाठी भन्नाट तडका देणार आहे हे नक्की.


या चित्रपटाची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles