भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटीलची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाली….

नाशिकमध्ये अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ किंवा ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणाऱ्या या भोंदूबाबाने अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि लोकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या भोंदू बाबा अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. तो पोलीस कोठडीत आहे. आता याप्रकरणी विविध स्तरावरुन प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सोलापूरच्या खंडोबाची वाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना समाजातील भोंदूगिरीवर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली.

 

सोलापूर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीच्या अदाकारीवर सोलापूरकर अक्षरशः फिदा झाले. या कार्यक्रमाला महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीने मंचावर एन्ट्री घेताच चाहत्यांनी जागेवरच उभे राहून डान्स करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. भोंदू बाबा अशोक खरातवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे. याकडे जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. यांसारख्या गोष्टी आपल्या देशात परत या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. यामुळे आताच यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील कडक शब्दात प्रतिक्रिया दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles