“त्या” १४ पाकड्यांना शहर शिवसैनिकांच्या ताब्यात द्या.. आम्ही पाहून घेऊ त्यांचं काय करायचं ते – शहरप्रमुख काळेंची मागणी
शहरातील पाकड्यांचा चौरंग करा, काळेंचे शिवसैनिकांना आवाहन
प्रतिनिधी : अहिल्यानगर शहरात १४ पाकिस्तानी वास्तव्यास आहेत. ते बेकायदेशीररित्या शहरात वास्तव्य करत आहेत. त्या १४ पाकड्यांना आमच्या शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांच्या ताब्यात द्या, अशी जाहीर मागणी जिल्हा प्रशासनाकडे सोशल मीडियातून शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. आम्ही पाहून घेऊ त्या पाकड्यांचं काय करायचं ते, असा इशारा त्यांनी दिला आहे. तशी पोस्ट काळे यांच्या सोशल मीडिया हँडल्स वरून वायरल होत आहे. निष्पाप २८ हिंदूंची हत्या केल्यानंतरही इथे पोसून राज्य सरकार त्यांना बिर्याणी खाऊ घालतय काय ?, असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरात पाकड्यांच्या चौदा औलादी आहेतच. पण सबंध महाराष्ट्रात या पीलावळींची ४८ शहरांतील संख्या ५०२३ एवढी प्रचंड आहे. मुख्यमंत्र्यांच्या एकट्या नागपुरात २४५८ पाकडे आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ११०६ आहेत. गंभीर बाब म्हणजे यापैकी केवळ ५१ जणां कडेच वैध दस्तऐवज आहेत. १०७ बेपत्ता आहेत. ते कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत हे सरकारला देखील माहित नाही. हे मी नाही तर राज्याचे गृह राज्यमंत्री महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिकृतपणे निर्लज्जपणे सांगत आहेत. यावर काळे यांनी शिवसेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काळे पुढे म्हणाले, हिंदुस्तानच्या भूमीवर पाय ठेवत धर्म विचारून हिंदूंची हत्या करणारे पाकिस्तानी अतिरेकी सुमारे तीनशे किलोमीटरची घुसखोरी करून परत जिवंत गेलेच कसे ? आमच्या निष्पाप हिंदू आया बहिणींच कुंकू पुसून भारताच्या पवित्र जमिनीवर महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने पाकडे असताना राज्य आणि देशाच सरकार काय करतय?
शिवसैनिकांनो पाकड्यांचा चौरंग करा :
 जिल्हा प्रशासनाने आम्हाला शहरातील पाकिस्तान्यांचे पत्ते द्यावेत. त्यांना आमच्या हवाली करावे. प्रशासन ते करणार नसेल तर शिवसैनिकांनो जिथे तुम्हाला पाकड्यांच्या औलादी अहिल्यानगर शहरात हाती लागतील तिथेच त्यांचा चौरंग करा, असे जळजळीत आवाहन किरण काळेंनी शिवसैनिकांना केले आहे.


