Saturday, February 21, 2026

Gold Price: सोन्याचे दर घसरले, पाहा आजचा १० ग्रॅमचा नवा भाव

सणासुदीच्या दिवसांत सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आता सोन्याच्या दरात आज घट झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दिस उत्तम आहे. १ तोळा सोन्याच्या दरात २७० रुपयांनी घट झाली आहे.

सोने ही एक गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव अनेक दिवसांपासून सतत वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परंतु सोन्याचे दर आता इथूनपुढे वाढतच जातील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोने ही तुमच्यासाठी चांगली गुंतवणूक ठरु शकते.

आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९८,९५० रुपये प्रति तोळा आहे. आज या दरात २७० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत २१६ रुपये आहे. सोन्याचे दर ७९,१६० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर ९०,७०० रुपये प्रति तोळा आहे. या दरात २५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,५६० रुपये आहे. या दरात २०० रुपयांनी घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात २१० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ७४,२१० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे भाव ५९,३६८ रुपये आहेत.

१४ जून रोजी तर सोने एक लाख रुपयांवर गेले होते. त्यानंतर थोडेफार कमी होऊन ते ९९ हजार रुपयांच्या पुढेच होते. मात्र, सोमवारी ९९ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोने ९७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या बारा दिवसातील सोन्याचे हे निचांकी भाव आहे. दुसरीकडे चांदीच्याही भावात ५०० रुपयांची घसरण झाली व ती एक लाख सात हजार रुपयांवर आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles