Thursday, October 30, 2025

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात मोठा फेरबदल; किमती अचानक बदलल्या, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहेत. दरम्यान, आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ८७० रुपयांनी घट झाली आहे. १ तोळ्यामागे तुम्हाला १,१९,४०० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. सोन्याच्या दर हे सतत वाढत असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. याचसोबत सोन्यावर जीएसटी लागला की त्यानंतर हे दर अजूनच वाढणार आहे. त्यामुळे अवेकजण सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामांन्याना मात्र फटका बसला आहे

आजचे सोन्याचे दर

आज १ तोळा सोन्याचे दर ८७० रुपयांनी वाढून १,१९,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९५,५२० रुपये झाले आहेत. हे दर ६९६ रुपयांनी वाढले आहेत.१० तोळ्याचे दर ८,७०० रुपयांनी वाढले असून हे दर ११,९४,००० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

२२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १० ग्रॅममागे ८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,०९,४५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८७,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १०,९४,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ६५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८९,५५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६४० रुपये झाले आहेत. हे दर ५२० रुपयांनी वाढले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी वाढले असून हे दर ८,९५,५०० रुपये झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles