सोन्यासोबत आता चांदीचे भाव देखील ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई जवळ आल्याने सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १५ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२७,१२० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११६,५२७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १६०,६२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,६०७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११६,३१६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२६,८९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,३१६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,८९० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,३१६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,८९० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११६,३१६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,८९० रुपये आहे.


