सोन्याचे सध्या सध्या घसरताना दिसत आहे. सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढत होते. दिवाळीत मात्र दरवाढीला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर पुन्हा थोड्याफार प्रमाणात दर वाढले. आज सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. सोन्याच्या दरात जवळपास ८२० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळत आहे. ऐन दिवाळीत सोन्याचे दर घसरले होते. यामुळे अनेकांनी सोने खरेदी केली. सोन्याचे दर घसरले असले तरीही ते १,२२,४६० रुपये आहेत.हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. दरम्यान, तरीही सणासुदीच्या दिवशी अनेकांनी सोने खरेदी केले. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.
आज १ तोळा सोन्याचे दर ८२० रुपयांनी कमी झाले आहे. हे दर सध्या १,२२,४६० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६५६ रुपयांनी कमी झाले असून ते ९७,९६८ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ८२०० रुपयांनी घसरले असून सध्या १२,२४,६०० रुपये होते.
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर ७५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१२,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८९,८०० रुपये झाले आहेत. हे दर ६०० रुपयांनी घसरले आहेत.१० तोळा सोन्याचे दर ११,२२,५०० रुपये आहेत. या दरात ७,५०० रुपयांची घसरण झाली आहे.
१८ कॅरेटचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर ६२० रुपयांनी घसरले असून १ तोळ्याची किंमत ९१,८४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४९६ रुपयांनी घसरले असून हे दर ७३,४७२ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ६२०० रुपयांनी घसरले असून ते सध्या ९,१८,४०० रुपये झाले आहेत.


