दिवाळी आणि तुळशी विवाह झाल्यानंतर लगेचच लग्नसराईला सुरूवात होते. लग्न ठरल्यानंतर आपण खरेदी करतो. खरेदीमध्ये कपडे, दागिने आलेच. लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने आलेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वारंवार चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोन्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घट झाली आहे.आज १४ नोव्हेंबर २०२५. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२७,८५० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८००० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,७८,५०० रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१७,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७००० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,७२,००० रूपये मोजावे लागतील.
२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९५,८९० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,८०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,५८,९०० रूपये मोजावे लागतील.
सोन्याच्या भावात घट झाली आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचं चित्र आहे. १ ग्रॅम चांदीसाठी आपल्याला १७३ रूपये मोजावे लागतील. १ किलो चांदीच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,७३,१०० रूपये मोजावे लागतील.


