सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरामध्ये देशभरात आज घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळतेय. जागतिक बाजारात कमकुवतपणा, देशांतर्गत मार्केटमध्ये खरेदीमध्ये घसरण यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,८९० रुपयांवर आला आहे. मुंबई, पुणे, जळगावसह चेन्नई आणि कोलकात्यामध्येही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस ४,१५८.३८ डॉलरवर घसरला आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. आज सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळी. दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबादसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरात सोन्याच्या दरात आजही घसरण पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते, डॉलर अधिक मजबूत झाला आणि वाढत्या बाँड उत्पन्नामुळे सोन्याची विक्री वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत.
दिल्ली: २४ कॅरेट – ₹१,२७,८९० | २२ कॅरेट – ₹१,१७,२४०
मुंबई: २४ कॅरेट – ₹१,२७,७४० | 22 कॅरेट – ₹1,17,090
अहमदाबाद: २४ कॅरेट – ₹१,२७,७९० | २२ कॅरेट – ₹१,१७,१४०
चेन्नई: २४ कॅरेट – ₹१,२७,७४० | २२ कॅरेट – ₹१,१७,०९०
कोलकाता: 24 कॅरेट – ₹1,27,740 | 22 कॅरेट – ₹1,17,090
हैदराबाद: २४ कॅरेट – ₹१,२७,७४० | २२ कॅरेट – ₹१,१७,०९०
जयपूर: २४ कॅरेट – ₹१,२७,८९० | 22 कॅरेट – ₹1,17,240
भोपाळ: २४ कॅरेट – ₹१,२७,७९० | 22 कॅरेट – ₹1,17,140
लखनौ: २४ कॅरेट – ₹१,२७,८९० | २२ कॅरेट – ₹१,१७,२४०
चंदीगड: २४ कॅरेट – ₹१,२७,८९० | 22 कॅरेट – ₹1,17,240


