Friday, February 20, 2026

Gold- Price: ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; आज सोन्याच्या १० ग्रॅमचा नवा दर ….

वर्षाच्या शेवटच्या महिन्याला सुरूवात झाली. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ६६० रूपयांची वाढ झाली होती. मात्र, आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात २८० रूपयांची घसरण झाली आहे. मात्र, चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. चांदीचे दर जैसे थे आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहोल आहे. लग्न म्हटलं की, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी आलीच. जर आपण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आपण खरेदी करू शकता. कारण सोनं स्वस्त झालं आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २८० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३०,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,८०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,०२,००० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,३५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,९३,५०० रूपये मोजावे लागतील.

२४ सह २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९७,६५० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,१०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,७६,५०० रूपये मोजावे लागतील.

सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, चांदीचे दर जैसे थे आहे. १ ग्रॅम चांदीसाठी आपल्याला १८८ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीसाठी आपल्याला १,८८,००० रूपये मोजावे लागतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles