सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा
सोने-चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याचे दर काही सतत वाढताना दिसत आहे. आज मात्र सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरीही किंमती १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे १ तोळा सोनं विकत घ्यायचे म्हटले तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर किती ते जाणून घ्या.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३४,१८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५२८ रुपयांनी घसरले असून १,०७,३४४ झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,६०० रुपयांनी घसरले असून १३,४१,८०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेटचे दर ६०० रुपयांनी घसरले असून १,२३,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅमच्या दरात ४८० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ९८,४०० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ६००० रुपयांची घसरण झाली असून १२,३०,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४९० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,००,६४० झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३९२ रुपयांनी घसरले असून ८०,५१२ झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,९०० रुपयांनी घसरले असून १०,४६,४०० झाले आहेत.


