सोन्याचे दर आठवड्याभरात सलग चार दिवस वाढत आहेत. आजदेखील सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर सतत वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने सोनं खरेदी करताना १० वेळा विचार करावा लागतोय.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या दिवसात अनेकजण सोनं खरेदी करतात. लग्नाच्या घरात नवरीसाठी दागिने बनवले जातात. परंतु आता हे दर वाढल्याने दागिने बनवण्यासाठीचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्याजोगा नाहीये. अनेकजण सोन्याचे दर कमी होती, या आशेवर होते. मात्र, सोन्याचे दर काही कमी होतच नाहीयेत. सोन्याचे दर पुढील काळात अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२४ कॅरेटचे दर
आज १ तोळा सोन्यामागे ७७० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर १,४०,०२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,१२,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७,७०० रुपयांनी वाढले असून १४,००,२०० रुपये आहेत.
२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,२८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५६० रुपयांनी वाढले असून १,०२,६८० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून हे दर १२,८३,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर
१८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ५८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,०२० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४६४ रुपयांनी वाढले आहे. हे दर ८४,०१६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे हे दर ५,८०० रुपयांनी वाढले असून हे दर १०,५०,२०० रुपये झाले आहेत.


