सोन्याच्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. सोन्याचे दर कमी होण्याचे नाव काही घेत नाही. महिन्याच्या शेवटी सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. होळीच्या आधी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे आज ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३१,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी १० रुपयांनी महाग झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ३,१६० रुपयांनी वाढले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,६४,७३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी या सोन्याचा दर १,६१, ५७० रुपये होता. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ३१,६०० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १६,४७,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. शुक्रवारी हे सोनं १६,१५, ७०० रुपयांना विकले गेले.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,५१,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. शुक्रवारी या सोन्याचा दर १,४८, १०० रुपये होता. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,१०,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हे सोनं १४,८१,००० रुपयांना विकले गेले.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यासोबतच आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,३७० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२३,५५० रुपये खर्च करावे लागतील. शुक्रवारी या सोन्याचा दर १,२१, १८० रुपये होता. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २३,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३५,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हे सोनं १२,११,८०० रुपयांना विकले गेले.


