Tuesday, March 3, 2026

Gold -Price सोन्याच्या दरात मोठी घसरण ;जाणून घ्या आजचे नवे दर

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. होळीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आजही सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं खरेदीची चांगली संधी आहे. आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांनी घसरण झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ४९० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,७०,०२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी या सोन्याचा दर १,७०,५१० रुपये होता. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं ४,९०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १७,००,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोमवारी हे सोनं १७,०५,१०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,५५,८५० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोमवारी या सोन्याचा दर १,५६,३०० रुपये होता. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,५८,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हे सोनं १५,६३,००० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,५२० रुपये खर्च करावे लागतील. सोमवारी या सोन्याचा दर १,२७,८८० रुपये होता. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,६०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,२७,५२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोमवारी हे सोनं १२,७८,८०० रुपयांना विकले गेले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles