सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज १२ मार्च २०२६ रोजी, गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १२ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १६२,१६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १४८,६४७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २६७,५६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,६७६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
शहर
२२ कॅरेट सोन्याचा दर
२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत १६१,८७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १४८,३८१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १६१,८७० रुपये आहे.


