Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; किमतीत मोठा बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा नवा दर

५ एप्रिल २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या दरांबाबत महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. राणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मागील सत्रातील घसरणीनंतर, आता सोन्याच्या दरात जोरदार सुधारणा दिसून आली आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ५ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,३५० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

 

सोन्याच्या दरावर विविध घटकांचा परिणाम होत असतो. यातील प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर, यूएस डॉलरचा विनिमय दर, लग्नसराई आणि सणासुदीच्या काळ आहे. या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होते. स्थानिक राजकीय घडामोडींचा देखील सोन्याच्या दरावर परिणाम होत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्यास भारतातही सोन्याचे दर वाढतात. कारण सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. त्यांचा परतावा देखील चांगला येतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles