17 जुलै 2025 रोजी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांजवळ जोरदार मारहाण्याची घटना घडली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांवर धक्का देत एकमेकांना शिवीगाळी करत होते. परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसता सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. यामुळे एकच गदारोळ पसरला आहे. या राजकीय गोंधळाच्या वेळीच, सोशल मीडियावर “मन भरून आलं…” हा जुना म्यूझिक व्हिडीओ व्हायरल झाला. हे गाणं सहा वर्षांपूर्वी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले असून, या म्यूझिक व्हिडीओमध्ये गोपीचंद पडळकर आणि साक्षी चौधरी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर सामाजिक माध्यमांवर या व्हिडिओने जोरदार प्रतिसाद मिळाला.
“मन भरून आलं…” या रोमँटिक डान्स व्हिडीओमध्ये गोपिचंद पडळकरांचा हटके अंदाज पहायला मिळालाय. या व्हिडिओमध्ये साक्षी चौधरी हिने पडळकरांसोबत स्क्रीन शेअर केली असून या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
या रोमँटिक डान्स व्हिडीओवर एक च नंबर साहेब, एकच छंद फक्त गोपीचंद, मला वाटतेय की पुढील दहा वर्षे हॉलीवुड, बॉलिवुड, कॉलीवुड ,टॉलीवुड नक्कीच गाजवणार् तसेच पुढचं दहा वर्षे ऑस्कर यांच्याच नावाने बुक राहणार अशा विविध प्रकारच्या विनोदी कमेंट येत आहेत. तसेत या व्हिडीओवर आतापर्यंत १० लाखांच्यावर लाईक्स आणि १० हजार कमेंट्स आल्या आहेत.