आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी
कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार
फॅमिली युनिट ५ पर्यंत वाढवण्याची मागणी
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला आहे.हा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढ २०२६ जानेवारीपासून मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या हातात वाढलेला पगार कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे. आठव्या वेतन आयोगासाठी आता पाऊले उचलली जात आहे.
मागच्या महिन्यात नॅशनल काउंसिल आणि जॉइंट कंसल्टेटिव्ह मिशनरी यांची मीटिंग झाली. यामध्ये वेतन आयोगा फॅमिली युनिट ३ वरुन करण्याची मागणी केली आहे. जर असं झालं तर थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्के वाढू शकतो.मिडिया रिपोर्टनुसार, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयी फेडरेशनने सेक्रेटरी जनरल सी श्रीकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तीन फॅमिली युनिटचा फॉर्म्युला १९५६ नुसार १५ व्या इंडियन लेबल कॉन्फरन्सअंतर्गत येतो. यावर बेसिक सॅलरी मोजली जाते.या प्रकरणामध्ये युक्तीवाद करतात की,पालक ही मुलांची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे फॅमिली युनिटमध्ये पालकांचाही समावेश करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे फॅमिली युनिट ५ सदस्यांची करण्याची मागणी केली जात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, जर फॅमिली युनिटची संख्या पाच केली तर मूळ वेतनात ६६ टक्क्यांची वाढ होईल.एका सदस्याची वाढ केल्यानंतर पगारात ३३.३३ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
जर फॅमिली युनिट कायदा लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढणार आहे. महागाई भत्ता हा ८ टक्क्यांनी वाढू शकतो आणि वार्षिक १२ टक्क्यांनी वाढू शकतो.


