Tuesday, November 4, 2025

गोविंद बर्गे प्रकरणात मोठी माहिती, त्याचा मोबाईल बंद आणि.. शेवटच्या 5-6 दिवसांत काय घडलं धक्कादायक कारणे समोर

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा गाडीत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. मंगळवारी रात्री सासुरे गावात कारमध्ये बर्गे हे मृतावस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केली असे बोलले जात असले तरी बर्गे यांनी जी दिला नाही तर त्यांच्यासोबत घातपात झाला असा नातेवाईकांचा आरोप असल्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. घातपाता आरोप केला जात असल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान याप्रकरणी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड (वय 21) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी काल तिला न्यायालयात हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान आता याच मृत्यूप्रकरणात एक मोठी अपेडट समोर आली आहे. मृत्यूपूर्वी गोविंद हे तणावात होते, मानसिक दृष्ट्या त्यांना खूप त्रास होत होता, आपल्या मित्रांशीही ते त्यांच्या त्रासाबद्दल बोलले होते अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात काही अपडेट्स समोर आले असून मित्रांनी अनेक तपशील सांगितले आहेत.

पूजाकडून सतत मिळणाऱ्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंग, पैशांचा लावलेला तगादा यामुळे गोविंद खूप निराश झाला होता, मानसिकरित्या खचला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याचा मित्र चंद्रकांत याच्याशीही तोय विषायवर बोलला होता, त्याच्याकडे मन मोकळ केलं होतं. मी खूप निराश झालो आहे, असंही त्याने मित्राला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कलाकेंद्र बांधण्यासाठी गोविंदने पूजाला लाखो रुपये दिले होते तसेच सासुरे गावात घर बांधण्यासाठी देखील त्याने मदत केली होती. तो तिचे सगळे हट्ट पूर्ण करायचा, मात्र तरीही पूजाच्या मागण्या, पैशांचा तगाद वाढतच चालला होता. गेवराईतला बंगला देखील नावावर करून दे अशी मागणी तिने केली होती. एवढंच नव्हे तर गोविंदच्या नावे असलेली पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावे करून दे, असाही तगाद तिने गोविंदकडे लावला होता. पण गोविंद तिचं ऐकत नव्हता, हे पाहून पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. गोविंदा तिला सतत फोन करायचा, भेटण्याचाही प्रयत्न करायचा मात्र त्याला यश आलं नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles