Saturday, November 1, 2025

महायुती सरकारच्या 100 दिवसाचे रिपोर्ट कार्ड, तीन विभागांची सुमार कामगिरी

राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल (Maharashtra ) जाहीर करण्यात आला आहे. 48 विभागातील तीन विभाग नापास झाले आहेत. सामान्य प्रशासन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागांची ढिसाळ कामगिरी असल्याचे समोर आले आहे.ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेला सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणारा अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी झाली आहे. तिन्ही विभागांना 35 टक्क्यांहून कमी गुण मिळाले आहे. सामान्य प्रशासन विभागाला फक्त 24 टक्के, नगरविकास विभागाला 34 टक्के मार्क, तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33 टक्केच गुण मिळाले आहे. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांत बारा विभागांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. 12 विभागांनी ठरवलेल्या मुद्यांवर शंभर टक्के काम केले. जलसंपदा,गृह,ग्रामविका,पशुसंवर्धन,बंदरे विभागास 100 टक्के गुण मिळाले. उच्च व तंत्रशिक्षण,कामगार,वस्त्रोद्योग विभागालाही पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. सांस्कृतिक,खणीकर्म, दुग्धव्यवसाय,रोहयो विभाग अव्वल ठरले आहेत.

राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.

गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. (Devendra Fadnavis)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles