दिल्ली येथे मा. अमितभाई शहा (गृहमंत्री व सहकारीता मंत्री भारत सरकार) साहेबांच्या निवासस्थानी माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे महाराष्ट्र राज्य) यांच्या समवेत भेट घेतली. या निमित्ताने लोणी बुद्रुक ता. राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी तसेच त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या एन.सी.डी.सी. लोन मुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण चालू आहे,
तसेच नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंती मा. अमितभाई शहा यांना केली आहे आणि त्यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली आहे.
दिल्लीत अमित शहांची घेतली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट
- Advertisement -


