बुऱ्हानगर येथे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा शोकाकुल वातावरणात दशक्रिया विधी संपन्न
दशक्रिया विधीला जनतेची अलोट गर्दी विविध मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे संपन्न
जनतेच्या व्यथा ऐकणारे नेतृत्व हरपले ह भ प जंगले महाराज शास्त्री
अहिल्यानगर सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जावे लागते काळाच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही सर्वसामान्य कुटुंबात तयार झालेले असामान्य नेतृत्व शिवाजीराव कर्डिले यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आपल्या प्रमाणापेक्षा कष्ट करतजनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असत विकासाच्या योजनाराबवत असत शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत घेऊन जात असताना आपला देह ठेवला पहिल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर सात दिवस पंढरपूर पायी दिंडी मध्ये वारकऱ्यांबरोबर चालले परमात्मा मधला अभिमुख नेता हरपला असून जनतेच्या व्यथा ऐकणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे वर्षभर विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहभोजनाचे आयोजन करत असत धोंड्याच्या महिन्यामध्ये संत महंतांची पूजा करत आमरसाचे जेवण दिले जात होते बुऱ्हानगर येथे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दशक्रिया विधी निमित्त प्रवचन रुपी सेवा ह भ प जंगले महाराज शास्त्री यांनी केले यावेळी ते बोलत होते शिवाजीराव कर्डिले यांचा दशक्रिया विधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला असून प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठीजनतेची अलोट गर्दी उपस्थित होती
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले होय आपल्याला संतांनी दिलेला धार्मिकतेचा वारसा ते पुढे घेऊन जात होते बापाचा आत्मा आपल्या मुलांमध्ये असतो म्हणून अक्षय कर्डिले वर प्रेम करणे त्याच्या पाठीमागे उभे राहणे हीच खरी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे मुद्दे नेते होते अक्षय कडील यांच्या रूपाने शिवाजीरावांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे आमच्यामध्ये संघर्ष झाला पण आमची मैत्री तुटली नाही एका विधानसभेमध्ये पराभव झाला मात्र ते खचले नाही मणक्याचे ऑपरेशन करायचे ठरले ते यशस्वी झाले मात्र शिवाजीराव कर्डिले स्वस्त बसले नाही काही दिवसातच घराबाहेर पडत कामाला लागले मणक्याचे ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस आराम करणे गरजेचे होते मात्र त्यांनी ऐकले नाही पुन्हा ते ऑपरेशन करावे लागले या काळात काही दिवस जनतेपासून लांब गेले असल्याचे मनाला खात होते मी चांगला मित्र गमावला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली
आमदार मोनिका राजळे म्हणाले की शिवाजीराव कर्डिले यांचा संघर्षमय प्रवास पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे सहकारी बँकेच्या माध्यमातून क्रांतिकारी निर्णय घेतले सहकार चळवळीमध्ये देखील त्यांनी चांगले काम उभे केले आहे जनतेवर प्रेम करणारे नेतृत्व आपण सर्वांनी गमावले आहे अक्षय कर्डिले यांनी देखील मोठ्या हिमतीने उभे राहून आपल्या वडिलांचा सुरू असलेला संघर्षमय प्रवास पुढे घेऊन जावा असे त्या म्हणाल्या
माजी महापौर संदीप कोतकर म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने कर्डिले कोतकर जगताप गाडे वाकडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एक आधारवड गेला असून आमची मोठी हानी झाली आहे आमच्या सुखदुःखात सहभागी होत मार्गदर्शकाची यशस्वी भूमिका पार पाडली आहे मधल्या काही काळात मणक्याच्या आजाराने त्रस्त होते याच्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती ते म्हणाले की मला आता लोकांमध्ये जाता येत नाही मी जनतेमध्ये नाही गेलो तर माझा आजार बरा होणार नाही मला लोकांमध्ये जाऊ द्या जनतेवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष केले आणि ते आपल्याला सोडून गेले अशी खंत जावई माजी महापौर संदीप कोतकर यांनी व्यक्त केली
माजी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की शिवाजीराव कर्डिले यांनी आमदारकी या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे माणसातला माणूस आपल्याला सोडून गेला आहे जनतेला सहज उपलब्ध होणारे नेतृत्व हरपले असल्याचे ते म्हणाले
यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार साहेबराव दरेकर राहुल जगताप प्रताप ढाकणे बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकरमाजी उपमहापौर गणेश भोसले सुजित झावरे राजेंद्र नागवडे प्राध्यापक शशिकांत गाडे चंद्रकांत गाडेसिताराम गायकर अभय आगरकर संभाजी कदम सचिन जाधव माधव कानवडे मंगलदास बांदल अमोल भनगडे निखिल वारे आदीसह विविध मान्यवरांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीला उजाळा दिला
दशक्रिया विधीला जनतेची अलोट गर्दी विविध मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे संपन्
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…. शिवाजीरावांचा वारसदार अक्षय कर्डिले….
- Advertisement -


