अवघ्या २४ तासातच गुलमोहर रस्ता वाहतुकीसाठी खुला
७ पोकलेन मशीनच्या सहाय्याने पारिजात चौकातील ड्रेनेज लाईनचे काम युद्धपातळीवर पूर्ण
नागरिकांकडून आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांचे आभार
अहिल्यानगर – ड्रेनेज लाईनच्या कामासाठी वाहतुकीसाठी पारिजात चौक येथे बंद करण्यात आलेला गुलमोहर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महानगरपालिकेने ठेकेदारामार्फत सात पोकलेन मशीनच्या सहाय्याने युद्धपातळीवर काम पूर्ण करून घेत दहा दिवसांऐवजी २४ तासातच काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
२४ तासात काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने पारिजात चौक येथे नागरिकांनी आमदार संग्राम जगताप, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, ठेकेदार दत्त दिगंबर कन्स्ट्रक्शन यांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शिरीष जानवे, प्रदीप घोडके, अभय खाबिया, लक्ष्मीकांत पठारे, विशाल साबळे, अशोक दहिफळे, आकाश सोनवणे, निलेश आव्हाड, प्रसाद पाठक, तसेच नरहरी नगर भागातील होमकर साहेब, चिंतामणी साहेब, सचिन कसबे, दीपेश दाणे, दिपक दळवी, विशाल पालवे आदी गुलमोहर रोड भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने पारिजात चौक येथे ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी गुलमोहर रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार काम सुरू करण्यात आले. मात्र, महानगरपालिकेने २४ तासात काम पूर्ण करून १० जून रोजी रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला केला आहे. युद्धपातळीवर काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिकांनी आमदार संग्राम जगताप, आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आभार मानले आहेत.


