मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, या आंदोलनाला आता राज्यभरातील मराठा समाजाकडून समर्थन मिळत आहे. अशातच या आंदोलनाला विरोध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्र घेतला आहे.
मनोज जरांगे यांना मुंबईत 29 तारखेला आंदोलन करू देण्यात येऊ नये, कारण सदर आंदोलन ही मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकारण आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे त्वरित त्यांना थांबवा. गुन्हा दाखल करा. अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.राज्यासह मुंबईत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मोठा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत आहेत आणि मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. असेही गुणरत्न सदावर्ते आपल्या तक्रारीत म्हणाले आहे. मुंबईच्या जीडीपीलेवर देखील मोठा परिणाम होणार आहे. तेव्हा ही बाब परवडणारी नाही. या विरुद्ध डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस अधीक्षक जालना यांना तक्रारी दाखल केली आहेत. लवकरचआझाद मैदान पोलीस स्थानकात आज पोलीस तक्रार देण्याकरिता डॉ. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील जात असल्याची माहिती पुढे आली आहे.


