शहरात गुटखा विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या फरार आरोपीला अटक व्हावी
काँग्रेस अल्पसंख्यांकचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- गुटखा विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या व अनेक गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या अतिक उर्फ अकिब मोहंमद शेख याला अटक करण्याची मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुटखा विक्रीच्या रॅकेट मधील सर्व आरोपी अटक झालेले असताना हा एकमेव आरोपी फरार असल्याबाबत उजागरे यांनी लक्ष वेधले.
अतिक उर्फ अकिब मोहंमद शेख याच्यावर गुटखा विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकतेच विशेष पथकाने त्याच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. यामध्ये इतर सर्व आरोपी अटक करण्यात आलेली असून, अकिब शेख हा अजूनही फरार आहे. यामुळे पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
गुटखा विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या व अनेक गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या अतिक उर्फ अकिब मोहंमद शेख याला त्वरीत अटक व्हावी, अन्यथा खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्याचा इशारा उजागरे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर शहरात गुटखा विक्रीचे रॅकेट …. हा एकमेव आरोपी फरार
- Advertisement -


