जिम ट्रेनरकडून इन्शुरन्स अ‍ॅडव्हायजरवर पिस्तूलने हल्ला; नगरमधील घटना

अहिल्यानगर -जिममध्ये स्टेरॉईड्स घेण्यास नकार दिल्याच्या रागातून  आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात तक्रार केल्याचा संताप मनात धरून एका जिम ट्रेनरने त्याच्या साथीदारांसह एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरा कॉलनीतील रहिवासी आणि इन्शुरन्स अ‍ॅडव्हायजर विवेक दामोदर आहिरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आहिरे हे कोहिनूर मॉलवरील एका जिममध्ये व्यायामासाठी जातात. तेथे जिम ट्रेनर सद्दाम हुसेन इद्रीस शेख याने आहिरे यांना शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्टेरॉईड्स घेण्याचा आग्रह धरला होता. आहिरे यांनी त्यास नकार दिला. या कारणावरून सद्दामने त्यांना जिममध्ये अपमानास्पद वागणूक दिली. या त्रासाला कंटाळून आहिरे यांनी ३१ मार्च रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात सद्दामविरुद्ध अर्ज दिला होता.याचाच राग मनात धरून रात्री दहाच्या सुमारास जेव्हा आहिरे हे त्यांच्या मित्रासोबत हॉटेलबाहेर उभे होते, तेव्हा सद्दामने त्यांना गाठले. माझ्याविरुद्ध अर्ज का दिला? असे विचारत त्याने आहिरे यांना धमकावले. त्यानंतर राधाबाई कॉलेजसमोर सद्दाम आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांनी आहिरे यांना अडवले. सद्दामने त्याच्या हातातील पिस्तूलने आहिरे यांच्या डोयावर प्रहार केला, तर त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या झटापटीत आहिरे यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैनही हिसकावण्यात आल्या आहेत. जखमी आहिरे यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles