लग्न म्हटलं की नवरा- नवरीसह घरातील मंडळी, कुटुंब आणि मित्रपरिवार हे देखील आनंदात असतात. लग्नसंमारभात हळदीच्या दिवशी डान्स हे समीकरणच झालं आहे. सोशल मीडियावर देखील हळदी संमारभातील डान्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक हळदीतला डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हळदीमध्ये विविध गाण्यांवर अनोख्या स्टाईलमध्ये नाचणारे काही कमी नसतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता, एक व्यक्ती ‘नटीनं मारली मिठी’ या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. गाण्याच्या तालासुरात ही व्यक्ती स्टेप्स करताना दिसते आहे. आजूबाजूला अन्य मंडळी देखील डान्स करताना दिसत आहे. मात्र या व्यक्तीने डान्सच्या अदाकारीने लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर @mgcmatic या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स केल्या आहेत. तर डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अनेकांनी काकांच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे.


