Sunday, December 7, 2025

महाराष्ट्रात ६ हजार कोटींचा आरोग्य घोटाळा, आमदार रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (आमदार) रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्यातील कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये, त्यांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतरही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या घोटाळ्यातील कंपनीने प्रकरण दाबण्यासाठी कोणाला किती खोके दिले, याची माहिती कागदपत्रांसह समोर आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये असा आरोप केला आहे की, “महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या ६००० कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.”

रोहित पवार पुढे म्हणाले की, “झारखंडमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम या कंपनीकडे होते. महाराष्ट्रातदेखील ३३ लाखांची अ‍ॅम्ब्युलन्स ८६ लाखांना विकत घेऊन ६००० कोटींपेक्षा अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे.”महाराष्ट्रातला आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या ६००० कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलीय.

https://x.com/RRPSpeaks/status/1948390425376784558/photo/1

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles