अहिल्यानगर: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम सुरु आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 5.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पारनेर, शेवगाव, कर्जत व पाथर्डी तालुक्यांत सरासरी 12 मिलिमीटर पाऊस झाला. जवळपास पंधरा दिवसांनंतर अहिल्यानगर शहरात शुक्रवारी शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. दरम्यान, विजांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.गुरुवारी सकाळी ते शुक्रवारी सकाळी या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 5.7 मिलिमीटर पाऊस झाला. पारनेर तालुक्यात सर्वाधिक सरासरी 15.2 मि.मी.,कर्जत तालुक्यात 10.6, शेवगाव तालुक्यात 13.8, पाथर्डी तालुक्यात 9.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अकोले तालुका वगळता सर्वच तालुक्यांत रिमझिम झाली आहे.


