Hero MotoCorp हिरो मोटोकॉर्प’ने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून ‘Hero Surge S32’ नावाचे देशातील पहिले ‘२-इन-१’ इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे गरजेनुसार याचे रूपांतर रिक्षातून स्कूटरमध्ये आणि स्कूटरमधून रिक्षामध्ये अवघ्या काही मिनिटांत करता येते. या नाविन्यपूर्ण संकल्पनेची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावरून या कल्पकतेचे कौतुक केले.
Hero Surge S32 चे रुपांतर थ्री-व्हीलरमधून स्कूटरमध्ये करण्यासाठी अवघे ३ मिनिटे लागतात. यासाठी एक विशेष मॉड्यूल देण्यात आले आहे, जे जोडून वाहनाचा आकार बदलता येतो. विशेष म्हणजे, टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर या दोन्ही मॉड्ससाठी स्वतंत्र मोटर आणि बॅटरी देण्यात आली आहे.
थ्री-व्हीलर मोडमध्ये हे वाहन ५०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. याशिवाय हे वाहन स्कूटर म्हणूनही वापरता येते.
यात एलईडी लाईट्स, डिजिटल डिस्प्ले आणि काही प्रगत सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.


