अहिल्यानगरमध्ये मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल हनी ट्रॅप; 10 लाखांची मागणी

सोनई: मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सोनईत हनी ट्रॅपचा प्रकार समोर आला. दहा लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणीतील (राहुरी) चौघांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर,गौरव अरून वाघमारे (सर्व रा. ब्राम्हणी, राहुरी) अशी अटक केल्यांची नावे आहेत.हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची जाणीव झालेल्या सोनई येथील व्यक्तींने फिर्याद दिली. श्रीरामपूर येथील महिलेने फिर्यादीस 20 ते 27 फेब्रुवारी पर्यंत वेळोवेळी मोबाईल फोनवर मेसेज केले. फिर्यादीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी केली. भितीपोटी फिर्यादीने 10 हजार रुपये दिले.

उर्वरित पैसे न दिल्यास नातेवाईकांना व्हिडिओ व मेसेज दाखवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. मोटरसायकलची चावी घेऊन फिर्यादीस दोघांनी बळजबरीने मोटरसायकलवर बसून एसबीआय बँकेमध्ये आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ब्राह्मणी येथील चौघांना सोनई पोलिसांनी तात्काळ केली असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. अटकेतील चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles