Thursday, October 30, 2025

पीएम किसानसाठी नव्यानं नोंदणी कशी करायची? 2000 रुपये मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी/ मार्च 2019 मध्ये सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात बिहार राज्यातील एका कार्यक्रमावेळी पाठवण्यात आली. आता शेतकऱ्यांना नव्यानं नोंदणी करायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन पद्धतींचा वापर करता येईल. पीएम किसानच्या लाभासाठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना येणाऱ्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळू शकतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणं दरवर्षी 6000 रुपये पाठवले जातात. आता नव्यानं नोंदणी करायची असल्यास पहिल्यांदा या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कोणत्या अटी शेतकऱ्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे ते जाणून घेऊयात. छोटे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करु शकतात. शेतकऱ्यांकडे शेती करण्यासारखी जमीन असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याचं नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रांमध्ये असणं आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर योजनेशी जोडलेले असणं आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
स्टेप 1 : सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : नवीन शेतकरी नोंदणी (New Farmer Registration) वर क्लिक करा.
स्टेप 3 : आता तुम्ही तुमचा 12 अंकी आधार क्रमांक नोंदवा.
स्टेप 4 : तुम्हाला 10 अंकी मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल.
स्टेप 5 : आता तुम्ही राज्याची निवड करा.
स्टेप 6 : स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा क्रमांक नोंदवा, मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक नोंदवा.
स्टेप 7 : आधार कार्ड, बँक पासबूक, जमिनीशी संबंधित कागदपत्रं अपलोड करा.
स्टेप 8 : सर्वा माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा, अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles