भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या शिष्टमंडळाची मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे मागणी
ग्रामपंचायतीने दिव्यांगांच्या 5 % निधीचे वाटप न केल्यास सरपंच ग्रामसेवकवर हक्कभंगाची कारवाई करा – वसंत शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीनी आजतागायत,आपल्या गावातील दिव्यांग बंधू व भगिनीं यांचा हक्काचा असणारा 5 % टक्के निधी वाटप केला नाही. तसेचं जाणून बुजून वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तरी ग्राम पंचायतने १५ ऑगस्ट पूर्वी दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांच्या हक्काचा 5 % निधीचे वाटप करावे अन्यथा जिल्हा परीषद समोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला, तसेच ग्रामपंचायतीने दिव्यांगांच्या 5 % निधीचे वाटप न केल्यास सरपंच ग्रामसेवकवर हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई गायकवाड,नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे, उपाध्यक्ष संदीप शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धिवर इत्यादी उपस्थित होते.
गेले अनेक वर्षापासून बऱ्याच ग्रामपंचायतीनि शासन निर्णय २०१६ नुसार मिळणारा दिव्यंगाचा ५ टक्के निधि आजतागायत वाटप केलेले नाही. आम्ही संघटनेच्या पदाधिकारी यांनी वारंवार पत्र व्यवहाराच्या माद्यमातून आपल्या कार्यालयाशी संपर्क केला असता, आम्हाला लेखी स्वरूपाची आश्वासने देऊन फक्त सहानभूती दाखवण्याचे काम करण्यात आले आम्हाला लेखी स्वरूपाची आश्वासने देऊन फक्त सहानभूती दाखवण्याचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात दिव्यांगाना न ग्रामीणभागत आजही कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नसल्याचे जाणवते. गेले अनेक वर्ष आम्ही फक्त पत्र व्यवहारांच्या माध्यमातून न्याय मागत आहे पण आम्हाला कधी न्याय मिळेल तेच समजत नसल्याने आम्ही नाइलाजास्तव जिल्हा परिषद कार्यालय आवारात आमरण उपोषण करणार आहोत, आमच्या दिव्यांगांच्या जीवितास काही धोका झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. अशी मागणी करण्यात आली


