Sunday, November 2, 2025

ईस्ट इंडिया फर्टिलिटी कॉन्व्हक्लेव 2025 मध्ये डॉ.हृषीकेश पंडित यांचा सहभाग

गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रियेचे यशस्वी सादरीकरण

नगर : पश्चिम बंगालमधील कोलकता येथील नामांकित आयएलएस हॉस्पिटलमध्ये नुकतीच ईस्ट इंडिया फर्टिलिटी कॉनक्लेव्ह 2025 ही वैद्यकीय कॉन्फरन्स पार पडली. यामध्ये अहिल्यानगर येथील डॉ.हृषीकेश पंडित यांनी सहभाग घेवून लॅप्रोस्कोपीव्दारे अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. कॉन्फरन्समध्ये फर्टिलिटी एनहान्सिंग एंडोस्कोपिक सर्जरी कार्यशाळा झाली. यात डॉ.पंडित यांनी एक अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे सादर केली.

संबंधित रूग्णाची पूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली होती. आता पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी ट्युबचे रिव्हर्सल आवश्यक असल्याने लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होती. डॉ.पंडित यांनी हे आव्हान स्विकारून आपला अनुभव, कौशल्य वापरुन शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने व अचूक पार पाडली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले. परिषदेत या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ, एंडोस्कोपिक सर्जन यावेळी उपस्थित होते. डॉ.अमत बसू, डॉ.पुषन कुंडु, डॉ.अभिनीबेश चॅटर्जी, डॉ.अरूण टांटिया, डॉ.रूची पिपारा अशा अनेक नामवंत डॉक्टरांनी डॉ.पंडित यांचे कौतुक केले.

डॉ.हृषीकेश पंडित हे भिंगार येथील पंडित हॉस्पिटलचे संचालक असून इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकॉजीस्ट एडोस्कोपिस्टस संघटनेचे मॅनेजिंग कमिटी सदस्य आहेत. ते नगरमधील पहिले 3 डी लेप्रोस्कोपी सेंटर पंडित हॉस्पिटलचे संस्थापक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जटील व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles