Saturday, November 1, 2025

अहिल्यानगरमध्ये युवकांनी कला केंद्रात येऊन महिलांना मारहाण करून अश्लील कृत्य,कला केंद्राच्या महिलांची पोलीस अधीक्षकांकडे धाव

कला केंद्राच्या महिलांची पोलीस अधीक्षकांकडे धाव.
रात्रीच्या वेळी काही युवकांनी कला केंद्रात येऊन महिलांना मारहाण करून अश्लील कृत्य केले असल्याने आरोपींना अटक करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- पांढरीपुल खोसपुरी येथे जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र आहे. त्या ठिकाणी महिला नाच गाण्याचे काम करते त्या ठिकाणी ४ मे २०२५ रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास काही युवक मध्य धुंद अवस्थेत आले होते व त्यांनी आतमध्ये प्रवेश करून आम्हाला पार्टी लावायची आहे. आत्ताच्या आत्ता आमची पार्टी लावा तेव्हा महिलांनी त्यांना सांगितले की आमचे कला केंद्र बंद झाले आहे असे सांगितले असता त्या युवकांना राग आला व त्यांनी महिलांना अपशब्द वापरत शिवीगाळ लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर ४ ते ५ मोटरसायकल वरून ८ ते १० युवक हे हातात तलवार, काठ्या, गज घेऊन आले सदरील घटनाही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून त्या युवकांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन गेले आहे. कला केंद्रातील महिलांना देखील हे तरुण धमकी देत असून या तरुणांना लवकरात लवकर अटक करून योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी अक्षय रामदास चेमटे राहणार घोडेगाव, सचिन महादेव दराडे वंजारवाडी, ता. नेवासा, आकाश मच्छिंद्र दराडे राहणार वंजारवाडी ता. नेवासा या तिघांवर मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे अन्वय कलमानुसार व रागिणी काळे यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles