आज होत असलेल्या नगरपंचायत कर्जत जिल्हा अहिल्यानगर नगराध्यक्ष या पदासाठी निवडणुकीबाबत सर्व १३ नगरसेवकांची चर्चा केली असता त्यांनी निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आहे .
त्यानुसार मी निर्णय जाहीर करीत आहे .
उपनगराध्यक्ष यांनी “ राजीनामा “ देण्याचं सांगत आहे ,
दोन्ही पदे रिक्त झाल्यानंतर
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दोन्ही पदासाठी एकत्रितपणे निर्णय घेण्यात येत आहे .
उर्वरित कालावधीसाठी चार जणांना विभागून
“ समान “ कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
त्यानुसार ही संधी चार जणांना मिळणार आहे.
” प्रथम ” कालावधी साठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार – सौ.रोहिणी सचिन घुले.
उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार – श्री संतोष (आप्पा ) सोपान मेहेत्रे .
” द्वितीय ” कालावधी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार- सौ.छायाताई सुनिल शेलार.
उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवार- नंतर निर्णय घेण्यात येईल.
* वरीलप्रमाणे दोन्ही पदाच्या निवडणुक प्रक्रीया संपताच श्री संतोष आप्पा मेहेत्रे गटनेते पदाचा
” राजीनामा ” देतील, त्यानंतर त्यापदावर लगेच दुसऱ्या नगरसेवकाची निवड करण्यात येईल.
वरील प्रमाणे निर्णय घेतला आहे सर्व आपल्या नगरसेवकांनी सहकार्य करावे व कार्यवाही करावी.
– प्रा.राम शिंदे


