T20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी एक नवीन वाद सुरु झाला आहे. पाकिस्तानी टीमने वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. 15 फेब्रुवारीला ते भारताविरुद्ध मॅच खेळायला मैदानावर उतरणार नाहीत. पाकिस्तान सरकारने स्वत: या निर्णयाची घोषणा केली आह. पाकिस्तानी टीम टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. पण ते ग्रुप स्टेजमध्ये भारताविरुद्ध मॅच खेळणार नाहीत. याला फॉरफिट मानलं जाईल. त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान होणार आहे.पाकिस्तानी टीम 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारताविरुद्ध ग्रुप स्टेजचा सामना खेळण्यासाठी उतरणार नाही. सामना अशा प्रकारे सोडून दिल्यामुळे भारताला 2 पॉइंट्स मिळतील. ग्रुप ए मधून क्वालिफिकेशनसाठी हा मोठा झटका असेल. कारण सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी पॉइंट्स आणि नेट रनरेट खूप महत्वाचा ठरणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट निगेटिव सुद्धा जाऊ शकतो. पाकिस्तानी टीम ग्रुप स्टेजमध्ये एकही मॅच हरल्यास ते टुर्नामेंट बाहेर जाऊ शकतात.भारत-पाकिस्तान मॅच सर्वाधिक कमाईचा सामना असतो. रिपोर्ट्सनुसार, या एका मॅचमुळे ब्रॉडकास्टर आणि स्पॉन्सरच्या रेवेन्यूमध्ये जवळपास 38 मिलियन डॉलर जवळपास 320 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी ब्रॉडकास्टर्स पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाविरुद्ध खटला सुद्धा दाखल करु शकतात.पाकिस्तानच्या या कृतीनंतर आयसीसीकडून मोठी कारवाई होऊ शकते. द्विपक्षीय मालिकांना स्थगिती, आशिया कपमध्ये सहभागी होऊ न देणं, पीएसएलसाठी परदेशी खेळाडूंची एनओसी रोखणं. सोबतच पाकिस्तानला कुठल्याही टुर्नामेंटच्या यजमानपदापासून लांब ठेवलं जाऊ शकतं.
IND vs PAK वर्ल्डकप सामना रद्द?, पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर BCCI ने स्पष्ट भूमिका मांडली
- Advertisement -


