भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट, सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी सुपर 8 मध्ये कुठली टीम जाईल?

भारत-पाकिस्तानमध्ये मागच्या काही वर्षात वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने झाले आहेत. त्या सामन्यांपेक्षा टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या होणार्‍या सामन्याबद्दल थोडी जास्तच उत्सुक्ता आहे. याचं कारण आहे या मॅच आधी झालेला वाद. पाकिस्तानने आधी या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नंतर आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर यू-टर्न घेत भारताविरुद्ध खेळण्यासाठी राजी झाले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 च्या फायनलनंतरही वाद झाला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं होतं. यावेळी सुद्धा वातावरण तसच गरम आहे. पण भारत-पाक सामन्याच्या या उत्सुक्तेवर, प्रतिक्षेवर आणि गरमा गरमीवर पाणी फेरलं नाही म्हणजे मिळवलं. कारण कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज आहे. तसा इशारा सुद्धा देण्यात आलाय.

रविवारी 15 फेब्रुवारीला ग्रुप ए मध्ये असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हा सामना होईल. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी फॅन्सच्या मनात प्रचंड उत्सुक्ता आहे. श्रीलंकन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला, तर या सर्व उत्साहावर पाणी फेरलं जाऊ शकतं. शुक्रवारी श्रीलंकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण-पूर्व मध्ये कमी दबावाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे सर्वच लोकांना सर्तक रहाण्यास सांगितलं आहे.

मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल?. फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही टीम्सना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास 1-1 पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे 5-5 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-8 मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे 2-2 पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे 4-4 पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles