आज पासून अर्थात 1 एप्रिलपासून देशात जनगणना करण्यास सुरुवात होणार आहे. तब्बल 15 वर्षांनंतर देशात जनगणना होणार असून, ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
अधिकारी घराघरात जाऊन माहिती संकलन करतील. घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यांची माहिती यामध्ये घेतली जाणार आहे.
अधिकारी घराघरात जाऊन माहिती संकलन करतील. घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यांची माहिती यामध्ये घेतली जाणार आहे.
जनगणनेदरम्यान विचारले जाणारे 33 प्रश्न
घराचा क्रमांक काय आहे?
कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक
कुटुंबप्रमुखाचे लिंग काय आहे?
जात कोणती आहे: सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय (OBC)?
कुटुंबात किती सदस्य आहेत?
कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे?
घराची मालकी कोणत्या स्थितीत आहे?
घरात किती खोल्या आहेत?
शौचालय आहे का?
शौचालयाचा प्रकार कोणता आहे?
सांडपाणी निचरा व्यवस्था आहे का?
पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे?
विजेचा स्रोत कोणता आहे?
बाथरूम आहे का?
घरात गॅस कनेक्शन आहे का?
घरात टीव्ही आहे का?
इंटरनेटची सोय आहे का?
घरात रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का?
स्वयंपाकासाठी मुख्य इंधन कोणते आहे? तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का?
खालीलपैकी टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन कोणता आहे?
तुमच्याकडे सायकल, स्कूटर किंवा मोटरसायकल आहे का?
तुमच्याकडे कोणती कार, जीप किंवा व्हॅन आहे?
तुमचे मुख्य अन्न कोणते आहे?
तुमचा इमारत क्रमांक किंवा जनगणना क्रमांक काय आहे?
घराचा वापर
घराची स्थिती
घराच्या फरशीसाठी वापरलेले मुख्य साहित्य कोणते. म्हणजेच, फरशी सिमेंट, ग्रॅनाइट किंवा मार्बलची आहे का?
घराच्या भिंतींमध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
घराच्या छतामध्ये कोणते साहित्य वापरले आहे?


