इंडिया पोस्टकडून ग्रामीण डाक सेवक भरती २०२६ अंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशभरातील २३ पोस्टल सर्कलमध्ये एकूण २८,७४० रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारीपासून सुरू झाली असून १४ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत आहे.या भरती प्रक्रियेत ग्रामीण डाक सेवक , ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर या पदांचा समावेश आहे. इंडिया पोस्टने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत.नोंदणी प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ रोजी सुरू झाली असून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी संपणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे. अर्जात दुरुस्ती करण्यासाठी १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संधी दिली जाणार आहे. या भरतीची पहिली गुणवत्ता यादी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या भरतीअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३,१६९ जागा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ३,५५३ आणि पश्चिम बंगालमध्ये २,९८२ पदे उपलब्ध आहेत. मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, केरळ आणि ओडिशा या राज्यांमध्येही हजाराहून अधिक जागा आहेत, तर दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये तुलनेने कमी पदे जाहीर करण्यात आली आहेत.१८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गणित आणि इंग्रजी हे विषय दहावीमध्ये उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित पोस्टल सर्कलची स्थानिक भाषा किमान दहावीपर्यंत शिकलेली असावी. संगणकाचे मूलभूत ज्ञान, सायकल चालविण्याची क्षमता आणि पुरेसे उपजीविकेचे साधन असणेही आवश्यक अटींमध्ये समाविष्ट आहे.या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे दहावीच्या गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीवर होणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये विभागाचे नाव, कार्यालय, पदाचे नाव, प्रवर्ग, नोंदणी क्रमांक, प्राप्त गुणांची टक्केवारी आणि कागदपत्र पडताळणीचे ठिकाण यांचा समावेश असेल.
अर्ज करण्याची अधिकृत लिंक – https://indiapost.gov.in/gdsonlineengagement



Shivaji
12 pass
No thanks
Job 40000 to 50000 thousent salelare
Yes
Hi
Sunil wandhekar
Mi Kam Karu