Sunday, February 22, 2026

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड, ऋषभ पंतकडे मोठी जबाबदारी, शार्दुलचे कमबॅक

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड झाली आहे. शुभमन गिल याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपद सोपण्यात आले आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीने आज इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांना स्थान मिळाले नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा चोपणाऱ्या साई सुदर्शन याला टीम इंडियात स्थान दिलेय. अभिमन्यू ईश्वरन यालाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.

शामी बाहेर, शार्दुल आत

१७ जणांच्या चमूची निवड करताना अनुभवी मोहम्मद शामी याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर शार्दूल ठाकूर याचे टीम इंडियात कमबॅक झाले आहे. त्याशिवाय आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्ण यालाही स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीशकुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्ण, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप, कुलदीप यादव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles