प्रसिद्ध कीर्तनकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) चर्चेत असलेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावर त्यांच्या कीर्तनातील काही क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मात्र आता त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे ते चर्चेत आले आहेत. थाटामाटात केलेल्या साखरपुड्यावरून त्यांच्यावर टीका होत होती. जे टीका करत आहेत त्यांना महाराजांनी उत्तर दिलं आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्येचा साखरपुडा सोहळा ४ नोव्हेंबरला पार पडला होता. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये वसंत लॉन्स येथे झाला. ज्ञानेश्वरी इंदोरीकर असे त्यांच्या कन्येचे नाव आहे. तर साहिल चिलप असे त्यांच्या होणाऱ्या जावयाचे नाव आहे.
साहिल सुनील चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील काटेडे येनेरे गावचे आहेत. सध्या नवी मुंबई येथे राहत असून वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये त्यांचा शेकडो वाहनांचा समावेश आहे. या साखरपुड्याला राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती. खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे हजर होते. या सोहळ्यात महाराजांना कोणताही सत्कार सोहळा ठेवला नाही, त्याऐवजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १ लाख ११ हजारांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला. मात्र थाटामाटाता सोहळा केल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. या टीकाकारांना महाराजांनी उत्तर दिले आहे.
मला तक्रार आली की, मी हे लग्न साध्या पद्धतीने करा असे सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटमाटात केला. हे त्यांना दाखवण्यासाठीच आहे की आपण बदल करू शकतो आणि बदल करण्याची आपली ताकद असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले.कार्यक्रमात कोणाचाच सत्कार न करता १ लाख ११ हजारांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली. वाढणाऱ्यांना ड्रेस वारकरी वेशातील होता, जेवणात महाराष्ट्रीय जेवण होते, चायनीज नव्हतं. व्याही भेटीचा कार्यक्रम बंद केला, जर तुम्हाला नाव ठेवायची तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाजी गरज असल्याचं इंदोरीकर महाराजांनी सांगितलं.


